वंदे भारतचे बुकिंग होईना

वंदे भारतचे बुकिंग होईना

‘वंदे भारत’चे बुकिंग होईना
रेल्वे पोर्टलवर गाडी रद्दचा संदेश; प्रवाशांत संभ्रम

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : यंदा कोकण रेल्वे मार्गावरील मान्सून वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत न केल्यामुळे बुकिंग पोर्टलवर वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस यांसारख्या गाड्या १० जून २०२४ पासून रद्द असा संदेश दाखवत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला आहे.
प्रवासी सुरक्षेसाठी कोकण रेल्वेवर प्रतिवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. याअंतर्गत सर्व गाड्या नियंत्रित वेगाने चालवल्या जातात. यामुळे प्रवास वेळेत वाढ होते. याचा सर्वांत जास्त परिणाम अतिजलद गाड्यांवर होऊन एका दिवसात मुंबईहून गोव्यात जाऊन परत येणाऱ्या गाड्यांचे आठवड्यातील दिवस कमी होतात. याचा फटका सध्या पावसाळी वेळापत्रक सुरू होण्याआधीच रेल्वे प्रवाशांना बसत असून मान्सून वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत न केल्यामुळे बुकिंग पोर्टलवर १० जूनपासून वंदे भारत, तेजस एक्स्प्रेससारख्या वेगवान आणि सर्वाधिक पसंतीच्या गाड्या दिसत नाहीत. यामुळे या गाड्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या की काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पुढील दहा दिवसांत गणेशोत्सव काळातले आरक्षण सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य आणि कोकण रेल्वेने लवकरात लवकर पावसाळी वेळापत्रकाची नोंद प्रवासी आरक्षण प्रणालीत करून सर्व गाड्यांचे आरक्षण सुरू करण्याची गरज असल्याचे मत रेल्वे प्रवासी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.
...
प्रीमियम गाड्यांचे आरक्षण...
भारतीय रेल्वेवर नियमित गाड्यांचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरू होते. त्यामुळेच पावसाळी वेळापत्रकात होणारे बदलही आरक्षण प्रणालीत तेव्हाच नोंद होणे अपेक्षित आहे; परंतु तसे अद्याप तरी झालेले नाहीत. त्यामुळे २२ ऑगस्ट २०२४ साठीचे आरक्षण सुरू झाले असले तरी अजूनही मुंबई-मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस यांसारख्या प्रीमियम गाड्यांचे आरक्षण ९ जून २०२४ नंतरचे (१० जूनपासूनचे) आरक्षण सुरू झालेले नाही.
...
शेड्युल अपडेट होणार!
कोकण रेल्वेकडून मान्सून वेळापत्रकाचे शेड्युल येत्या दोन ते तीन दिवसांत आल्यावर रेल्वेच्या तिकीट आरक्षण प्रणालीमध्ये अपडेट करण्यात येईल. त्यानंतर प्रवाशांना तिकिटांचे आरक्षण करता येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com