एसटीवर प्रवाशांमुळे लक्ष्मीची कृपा

एसटीवर प्रवाशांमुळे लक्ष्मीची कृपा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : राज्यासह ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्गासाठी जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. त्यामुळे उन्हाळ्यात एसटीने जादा वाहतुकीचे नियोजन केले होते. त्याला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला असून २२ एप्रिल रोजी ३१ कोटी ११ लाखांचे उत्पन्न मिळाल्याने राज्यभरातील प्रवाशांच्या प्रतिसादाने एसटीवर लक्ष्मीची कृपा झाल्याचे चित्र आहे.
दिवाळीत सर्वजण गावी जातात. त्यामुळे एसटीने हंगामी भाडेवाढ केली होती. सर्व प्रकारच्या बसच्या तिकीटदरात सरसकट दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली होती. त्यामुळे भाऊबिजेच्या दिवशी १५ नोव्हेंबर राज्यातील सर्व मार्गावर गाड्या धावल्याने एका दिवसात महामंडळाने ३१ कोटी ६० लाखांचा महसूल मिळवला होता. सध्या उन्हाळ्यानिमित्त एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील ३१ पैकी सात विभागांत शंभर टक्के प्रवासी संख्या आहे. त्यात यवतमाळ, बुलडाणा, अकोला, जळगाव, गडचिरोली, लातूर, धुळ्याचा समावेश आहे. त्यामुळे २२ एप्रिलला एसटीला पुन्हा ३१ कोटींचे उत्पन्न मिळाले असून पाच महिन्यांतील हा उच्चांकी आकडा आहे.
-----------------------------------
वाहतुकीचा रोज आढावा
एसटी महामंडळाकडे गाड्या कमी असल्याने नुकसान सहन करावे लागत आहे; परंतु गाड्यांचे योग्य नियोजन करत उत्पन्न वाढले आहे. त्यासाठी राज्यात सहा प्रादेशिक विभागांत अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून वाहतुकीचा रोज आढावा घेतला जातो. त्यावर एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर लक्ष ठेवत आहेत. 
--------------------------------
एसटीला उन्हाळ्यात प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे; परंतु गरजेच्या तुलनेत गाड्यांची संख्या कमी आहे. अपेक्षित गाड्या आल्यास एसटी महामंडळ सातत्याने नफ्यात येईल.  
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस
----------------------------------
वर्ष उत्पन्न
१५ नोव्हेंबर २०२३ ३१ कोटी ६० लाख
२२ एप्रिल २०२४ ३१ कोटी ११ लाख
-----------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com