काँग्रेसचा उत्तर मध्य मुंबईचा पेच सुटला

काँग्रेसचा उत्तर मध्य मुंबईचा पेच सुटला

वर्षा गायकवाडांची उमेदवारी जाहीर, भाजपचा उमेदवार कोण?
मुंबई, ता. २५ : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना काँग्रेस पक्षाने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी आज वर्षा गायकवाड यांची ही उमेदवारी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला द्यायची, याचा काँग्रेसमध्ये शोध सुरू होता. गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने या मतदारसंघातील पेच सुटला आहे.
वर्षा गायकवाड या दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघासाठी आग्रही होत्या. कारण याच मतदारसंघात त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे खासदार होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा होता. मात्र, त्यांना आता उत्तर मध्य हा मतदारसंघ जाहीर केला आहे. येथे भाजपचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. त्यामुळे गायकवाड यांची लढत भाजपच्या कोणत्या उमेदवाराशी होणार हे आता लवकरच स्पष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com