‘मी मतदान करणारच, तुम्हीही करा’

‘मी मतदान करणारच, तुम्हीही करा’

वाशी, ता. २९ (बातमीदार) : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी निवडणूक होणार असून या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावावा, यादृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती मोहिमेमध्ये विविध प्रसारमाध्यमांचा वापर करण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही मोठा हातभार लागत आहे.
नवी मुंबई हे स्वच्छतेत देशामध्ये अग्रमानांकित असणारे शहर असून येथील सेवाभावी वृत्तीने काम करणारे स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता कार्याप्रमाणेच विविध लोकोपयोगी उपक्रमातही मनापासून सहभागी होत असतात. या अनुषंगाने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले लावण्यात आले आहेत. त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश प्रसारण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
-----------
गणवेशावर आवाहनाचे बिल्ले
बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत असून, त्यावर असलेल्या ‘मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार’ अशा मजकुरातून अभिनव पद्धतीने मतदान करण्याविषयीचे आवाहन केले जात आहे. याशिवाय महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीही मतदान करण्याविषयीच्या जनजागृतीपर संदेशांचे प्रसारण करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com