रसायनीत भात कापणीचे काम सुरू

रसायनीत भात कापणीचे काम सुरू

रसायनीत भातकापणीचे काम सुरू
अनुकूल हवामानामुळे सध्या भरघोस पीक
रसायनी, ता. २९ (बातमीदार) : यंदा तालुक्‍यातील हवामान चांगले असल्‍याने भाताचे पीक सर्वाधिक आले आहे. त्‍यामुळे रसायनी परिसरात दुबार भातकापणीचे काम सुरू झाले आहे. तर सध्या काहीसे ढगाळ हवामान होत असल्‍याने कापणीचे काम शेतकऱ्यांनी लगबगीने सुरू केले आहे.
मागील काही वर्षापासून परिसरात सिंचनाचे काम योग्यप्रकारे झाल्‍याने तालुक्‍यातील पाण्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला आहे. त्‍यामुळे शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक घेत आहे. सुरुवातीला पेरणीनंतर रोपांची वाढ आणि त्यानंतर लावणीसाठी अनुकूल तसेच पोषक वातावरण असल्याने पिकाची वाढ चांगली झाली आहे. यंदाच्या वर्षी भाताचे पीक चांगले आले आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी संकरित वाणाचे पीक घेतले आहे. यंदाच्या वर्षी भाताचे पीक चांगले आले असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. परिसरात पाताळगंगा, बामणोली धरण आणि मोहोपाडा येथील एमआयडीसीच्‍या केंद्रातील पाण्यामुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला आहे. त्‍यामुळे येथील शेतकरी दुबार भात आणि भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेत आहेत. सध्या वातावरणात उकाडा जाणवत आहे. पारा चाळिशी पार गेला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे, म्हणून कापणीनंतर शेतकरी तत्‍काळ भात रचून ठेवत आहे. खराब हवामान निवळल्यानंतर झोडपणी करणार असल्‍याचे येथील शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
.....................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com