धारावीत दुषित पाण्याचा पुरवठा

धारावीत दुषित पाण्याचा पुरवठा

धारावीत दूषित पाण्याचा पुरवठा
अनेक रहिवाशांना पोटाचा त्रास
धारावी, ता. २९ (बातमीदार) : धारावीत पालिकेकडून दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्‍याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. गढूळ पाण्यामुळे रहिवाशांना पोटाचा त्रास होत आहे. पालिकेने पिण्यायोग्‍य पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.
धारावीमध्ये पालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. काही विभागांत सकाळी, तर काही विभागांत सायंकाळी पाणी येते. गेल्‍या काही दिवसांपासून पालिकेकडून पुरवठा केला जात असलेल्या पाण्याला दुर्गंधी येत आहे; तर अनेक ठिकाणी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
धारावीतील खांबदेव नगर येथील वसाहतीतील काही इमारतींना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यामुळे अनेक रहिवाशांना पोटदुखीचा त्रास होत आहे. स्थानिक रहिवासी संतोष लिंबोरे यांना दोन दिवसांपासून पोटाचा विकार जाणवू लागला होता. त्यांनी डॉक्टरांना सांगितले असता डॉक्टरांनी पिण्याच्या पाण्यामुळे पोटदुखी होत असल्याचे सांगितले. त्‍यांनी अधिक चौकशी केली असता ते राहत असलेल्या विठ्ठल सोसायटीतील अनेक रहिवाशांना पोटाचा त्रास होत असल्याचे आढळले. त्यामुळे त्यांनी इमारतीची टाकी साफ करून घेतली. तरीही पिवळसर पाणी येत आहे. त्‍यामुळे विठ्ठल सोसायटीतील रहिवाशांनी याची तक्रार पालिकेच्या ग/ उत्तर विभागाच्या पाणीपुरवठा विभागाकडे केली आहे. विभागातील ओम दत्त सोसायटीमधील संतोष कांबळे, बाळू कांबळे यांनीही त्यांच्या इमारतीत गेल्‍या काही दिवसांपासून गढूळ पाणी येत असल्याचे सांगितले.

आमच्याकडे धारावीतील खांबदेवनगर येथील विठ्ठल सोसायटीच्या इमारतीमध्ये गढूळ पाणी येत असल्याची तक्रार मिळाली आहे. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली आहे. तसे काही आढळले नाही.
- नीलेश खडसे,
उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com