खर्डीत यात्रेनिमित्त शांतता कमिटीची सभा

खर्डीत यात्रेनिमित्त शांतता कमिटीची सभा

खर्डी, ता. २९ (बातमीदार) : येथील सोनाई-सिताई देवीची यात्रा ५ मे ते १० मेदरम्यान होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यात्रेदरम्यान कायदा-सुव्यवस्था चोख राहावी, यासाठी शहापूरचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डीचे पोलिस उपनिरीक्षक सुनील संसारे यांनी खर्डी येथील पोलिस दूरक्षेत्राच्या आवारात शांतता कमिटी, देवालय ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकारी, मुस्लिम मोहल्ला कमिटी व खर्डीतील विविध संघटना, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सभेचे आयोजन शनिवारी (ता. २७) रोजी केले होते.

यात्रा व संदलच्या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांनी देवी मंदिर व मस्जिद, दरगाह येथे भेट देऊन पाहणी केली. यात्रेदरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने बॅनर लावण्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन शुभेच्छा बॅनर लावावेत, कुठेही आगीच्या घटना घडल्यास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याचे टँकर उपलब्ध ठेवावे, रात्रीच्या वेळी लाईट गेल्यास तत्काळ जनरेटर उपलब्ध असावा, जेणेकरून भाविकांची चेंगराचेंगरी होणार नाही, रस्त्यावर सीसीटीव्ही लावावेत, यात्रौत्सव कमिटीची निवड करावी, भाविकांना कुठल्याही अडचणींना सामोरे जाऊ लागू नये, यासाठी ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची व तात्पुरत्या दवाखान्याची सोय करावी, अशा सूचना पोलिसांनी यावेळी केल्या.

शांतता भंग करण्याचा कोणी प्रयत्न करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. यावेळी सरपंच मंगल गावित, उपसरपंच मौसीम शेख, माजी सरपंच दिलीप अधिकारी, खर्डी देवालय ट्रस्ट गणेश अधिकारी, रामचंद्र तुपे, विजय बागुल, नरेश अधिकारी, मकसूद सय्यद, शाकिर शेख, असिफ शेख, प्रशांत खर्डीकर, फारूक मेमन, शैलेश खर्डीकर, धनंजय बागुल, यतीन दांडगे, असपाक अत्तार, सचिन सारंगधर यांच्यासहित राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शांतता कमिटी, मुस्लिम मोहल्ला कमिटी यांच्यासहित अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com