उरणमध्ये आंब्यांची आवाक वाढली

उरणमध्ये आंब्यांची आवाक वाढली

उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली
ातालुक्‍यात यंदा भरघोस पीक; दर कमी झाल्‍याने खवय्यांची चंगळ
उरण, ता. २९ (बातमीदार) : उरण तालुक्यात यावर्षी आंब्याच्या झाडांना चांगला मोहोर आलेला होता. त्यामुळे यंदा तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात आंब्यांचे उत्‍पादन झाले आहे. येथील बाजारपेठेमध्ये आंब्यांची आवक वाढली असून सर्वसामान्यांच्‍या खिशाला परवडतील, अशा दरामध्ये त्‍याची विक्री होत असल्‍याने खवय्यांकडून आनंद व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
उरण तालुक्यात आमराई पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकोन, आवरे, पाले, गोवठणे, कोप्रोली, पानदिवे, कळंबुसरे, चिरनेर, विंधने, कंठवली, भोम आदी गावांमध्ये हापूस, केशर, लंगडा, रत्ना राजापुरी, रायवळ, बिटकी, निमन्या पायरी, चौथापुरी, दशहारी इत्यादी सुधारित आंब्यांच्‍या जातींची झाडे लावण्यात आली आहेत. तर शेतकरी आपल्‍या शेताच्‍या बांधावर, घरापुढे मोठ्या प्रमाणावर आंब्यांची झाडे लावतो. नवीन सुधारित कलम लवकर तसेच भरपूर प्रमाणात फळे देत आहेत. आंब्याच्या नवीन कलमांमुळे कमी जागेत जास्त झाडे येत असून त्‍यांना मुबलक फळेदेखील लागत आहे. यावर्षी वातावरण पोषक असल्यामुळे उरण तालुक्यात सर्वत्र आंब्याची झाडे बहरलेली दिसत आहेत. अनेक गावांमध्ये झाडांना मोठ्या प्रमाणात आंबे आल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या उष्म्याचा ताप नागरिकांना होत असला तरी त्‍याचा फळांवर काहीही परिणाम झालेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आंबा पंधरा ते वीस दिवस आधीच बाजारात दाखल झाला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस आंब्याच्या खरेदीकडे ग्राहकदेखील वळले आहेत. आंबा पीक भरघोस आल्याने आंब्याचे दरदेखील उतरले आहेत. ग्रामीण भागातून हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी आंब्याची थेट खरेदी होत आहे. पूर्वी आंबा उत्पादक संपूर्ण पीक विकत असे, यंदा मात्र शेतकरी स्वतःच घरात आंबे पिकवून त्याची विक्री करत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
..........................
उरण परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्यांना मोहोर आला होता. पोषक वातावरणामुळे मोठ्या प्रमाणावर आंबा पीक या भागात पाहायला मिळत आहे. सध्या ग्राहक बाजारातून आंबा खरेदी करण्यापेक्षा थेट घरी येऊन आंबे खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
-विकास म्हात्रे, शेतकरी, उरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com