अठरा शिवसैनिकांची निर्दोष सुटका

अठरा शिवसैनिकांची निर्दोष सुटका

अठरा शिवसैनिकांची निर्दोष सुटका
राणेंची सभा उधळल्याचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर २००५मध्ये शिवसैनिकांनी त्यांची सभा उधळवून लावली होती. याप्रकरणी ४७ शिवसैनिकांविरोधात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाने १८ शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता केली. हे १८ जण जाखादेवी येथे करण्यात आलेल्या निदर्शनातील आरोपी होते.
शिवसेनेच्या विशाखा राऊत, महेश सावंत व इतरांचा त्यात समावेश आहे. या प्रकरणात खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई आदींसह २८ शिवसैनिकांची न्यायालयाने यापूर्वीच निर्दोष सुटका केली आहे. एकाचे नाव खटल्यातून वगळण्यात आले होते.
प्रभादेवीत राणे समर्थकांनी २४ जुलै २००५ रोजी सभा आयोजित केली होती. या सभेत शिवसैनिक घुसले व राणे समर्थकांना भिडले. यावेळी झालेल्या दगडफेकीत एका पोलिस कर्मचाऱ्याला गुडघ्याला इजा झाली. याप्रकरणी पोलिसांनी ४७ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. आरोपींमध्ये खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार रवींद्र वायकर, किरण पावसकर, दगडू सकपाळ, विशाखा राऊत व इतर शिवसैनिकांचा समावेश आहे. याप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर हा खटला चालला. साक्षीदारांच्या जबाबात विसंगती असण्याबरोबरच आरोप सिद्ध करणारे सबळ पुरावेच नाहीत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने शिवसैनिकांना दिलासा दिला व त्यांची निर्दोष मुक्तता केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com