मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांचे अभियान

मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांचे अभियान

ठाणे, ता. २ : लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ठाण्यातील श्री मावळी मंडळ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ठाणे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विनय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जागृती अभियानात भाग घेतला. तसेच नौपाडा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक रामचंद्र मोहिते आणि नौपाडा वाहतूक विभागाचे पोलिस अंमलदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोमवारी (ता. २९) सायंकाळी घेण्यात आला. यावेळी शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी मतदान जागृतीचे तसेच मतदान संदेशाच्या घोषवाक्याचे फलक हाती घेऊन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

ठाण्यातील तीन हात नाका येथे सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला ठाणे वाहतूक विभागाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, शाळेचे सीईओ प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी मतदान जागृती अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले. लोकशाहीने नागरिकांना दिलेला मतदानाचा अधिकार लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदान करणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांनी हे मतदान जागृती अभियान राबविले आहे. असे शाळेच्या मुख्याध्यापिका उत्कर्षा हवालदार यांनी सांगितले. यावेळी सिनेदिग्दर्शक विजू माने यांनीही या उपक्रमाची स्तुती करून मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला. दरम्यान, मतदान जागृती, मतदान हक्क असे विषय आता शालेय अभ्यासक्रमात समावेश करावेत. अशी अपेक्षा शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com