डोंबिवलीत आदित्य ठाकरे यांची रॅली

डोंबिवलीत आदित्य ठाकरे यांची रॅली

डोंबिवली, ता. ३० : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन गटांतील उमेदवारांत चुरशीची लढत होणार आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी मंगळवारी (ता. ३०) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी डोंबिवलीत युवा सेना नेते आदित्य ठाकरे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. यावेळी इंडिया आघाडीतील घटकपक्षांची मोठी गर्दी दिसून आली.
शिवसेनेतील फुटीनंतर लोकसभेची पहिलीच निवडणूक होत आहे. या मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असे वातावरण आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांनी आज उमेदवारी भरला आहे. तर शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवसैनिकांनी इंदिरा गांधी चौकात मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून जमण्यास सुरुवात केली होती. या वेळी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आले हाेते. आदित्य यांना पाहताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले. जसजशी वेळ वाढत होती, सूर्य डोक्यावर येत होता, तसे कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती. मध्यवर्ती शाखा येथून चार रस्ता, टिळक रोड, शेलार नाका, घरडा सर्कल मार्गे र्रली मार्गस्थ झाली. कळवा मुंब्रा, कल्याण डोंबिवली, दिवा, उल्हासनगर, कल्याण ग्रामीण, १४ गाव परिसर येथून शिवसैनिक दरेकर यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी आले होते. ढोल-ताशांच्या गजरात ही रॅली काढण्यात आली. विटेंज कार घेऊन शिवसैनिक या रॅलीत सहभागी झाले. ही कार सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. वैशाली दरेकर अर्ज दाखल केल्यानंतर युवा सेना नेते आदित्य ठाकरे, सचिव वरुण सरदेसाई, आमदार जितेंद्र आव्हाड, सदानंद थरवळ, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी हृता आव्हाड, महेश तपासे यांसह अनेक पदाधिकारी रॅलीत सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com