घणसोलीत अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

घणसोलीत अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

घणसोलीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
वाशी, ता. २ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील घणसोली विभाग कार्यालयांतर्गत असणाऱ्या सिडकोच्या भूखंडावर अनधिकृत बांधकामांवर नुकतीच बेधडक कारवाई करण्यात आली. घणसोली विभाग कार्यालयातील रबाले स्टेशन रोड परिसरातील पाटील कंपाऊंड येथे सिडको व नवी मुंबई महापालिकेच्या संयुक्त विद्यामाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रबाळे स्टेशन रोड परिसरातील पाटील कंपाऊंडजवळील घरमालक व विकसक केशव पाटील यांच्या वतीने अनधिकृत इमारतीचे काम सुरू होते. त्यामुळे पालिकेच्‍या घणसोली विभागामार्फत संबंधित बांधकामाला नोटीस बजावण्यात आलेली होती. मात्र तरीदेखील संबंधित मालकाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नव्‍हती. त्‍यामुळे अखेर महापालिकेने सदरील इमारतीवर कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com