अनुदानित तुकड्यांवर बदलीचा मार्ग मोकळा

अनुदानित तुकड्यांवर बदलीचा मार्ग मोकळा

भिवंडी, ता. २ (बातमीदार) : विनाअनुदानित/अंशतः अनुदानित तुकड्यांवरून अंशतः अनुदानित/अनुदानित तुकड्यांवर बदली करण्यास स्थगिती देणारा आदेश १ डिसेंबर २०२२ रोजी सरकारने निर्गमित केला होता. अखेर हा निर्णय रद्द केला आहे. ८ जून २०२०ची नियमावलीतील सुधारणा व १ एप्रिल २०२१च्या सरकारच्या निर्णयानुसार विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीवरून अंशतः अनुदानित किंवा १०० टक्के अनुदानित तुकडीवर बदली करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारच्या या निर्णयाविरोधात अनेक संस्था व शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने सरकारचा निर्णय रद्द केला आहे.

महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम ४१ मध्ये ८ जून २०२० रोजी सरकारने सुधारणा केली होती. ८ जून २०२०च्या सुधारणेचा जीआर सरकारने तब्बल १० महिन्यांनी म्हणजे १ एप्रिल २०२१ रोजी निर्गमित केला. तसेच अंमलबजावणी ८ जून २०२० पासून करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १ डिसेंबर २०२२ला नियम सुधारणांना व १ एप्रिल २०२१च्या जीआरला स्थगिती देणारा जीआर निर्गमित केला होता. त्याविरूद्ध अनेक संस्था व शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. उच्च न्यायालयाने १ डिसेंबर २०२२चा जीआर रद्द करून पूर्वीप्रमाणे विनाअनुदानितवरून अनुदानितमध्ये बदल्या करण्यास नियमाप्रमाणे मान्यता देण्याचे आदेश दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com