कळवा शिवसेना शाखेचीही पुनर्बांधणी

कळवा शिवसेना शाखेचीही पुनर्बांधणी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : कळवा येथील शिवसेनेच्या शाखेवर काही वर्षांपूर्वी कारवाई केली होती. त्यानंतर ती शाखा एका कंटेनरमध्ये चालवण्यात येत होती; मात्र आता निवडणुकीच्या काळात अनेक बैठका या शाखेत होत असल्याने जागा अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे या शाखेची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. ऐन निवडणुकीच्या काळात कळव्याच्या शाखेच्या पुनर्बाधणीच्या कामाला वेग आल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेतील बंडाळीनंतर दोन गटात शिवसेना विभागली गेली. त्यानंतर खरी शिवसेना आमची असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. पक्षात दोन गट पडल्यानंतर शाखा ताब्यात घेण्यावरून यापूर्वीच वाद चिघळला होता. त्यामुळे शिवसेना शाखा कोणाच्या? हा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यात मुंब्र्याची शाखा ताब्यात घेण्यावरून हा वाद चांगलाच पेटला होता. मुंब्र्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली शाखा शिंदे गटाने ताब्यात घेऊन ही शाखा अक्षरशः बुलडोझर लावून जमीनदोस्त करून या ठिकाणी नवी शाखा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंब्र्याच्या शाखेचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ कळवा शाखा मात्र कंटेनरमध्येच चालवण्यात येत होती. कळव्याची शाखा ही अतिशय जुनी शाखा आहे. या शाखेच्या पुनर्बांधणीचीदेखील मागणी करण्यात येत होती.

कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा नाक्यावरील जनसंपर्क कार्यालयावर जेव्हा कारवाई केली होती तेव्हा समोर असलेल्या शिवसेना शाखेवरदेखील कारवाई केली होती. तेव्हापासून ही शाखा कंटेनरमध्ये चालवण्यात येत होती. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखेमध्ये अपुरी पडत असल्याचे कारण देत पुनर्बांधणी करण्यात येत आहे. कंटेनर हटवून शाखेच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात वातानुकूलित टेंट उभारण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com