समृद्ध, संपन्न महाराष्ट्र घडवू या!

समृद्ध, संपन्न महाराष्ट्र घडवू या!

अलिबाग, ता. १ : उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती आहे. आपण सर्वांच्या सहकार्याने समृद्ध आणि संपन्न महाराष्ट्र ही ओळख अबाधित राहील, असा विश्‍वास महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त अलिबाग येथील पोलिस कवायत मैदानावर मुख्य शासकीय समारंभात तटकरे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. या वेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
आपल्या शुभेच्छा संदेशात तटकरे म्हणाल्या शेती, औद्योगिक उत्पादने, व्यापार, दळणवळण आदी क्षेत्रांत देशातील आघाडीच्या राज्यांपैकी एक असलेला महाराष्ट्र देशाचे आर्थिक शक्तीकेंद्र असून देशाच्या पायाभूत विकासात महाराष्ट्राने नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असेही तटकरे म्हणाल्या. संचालनाचे नेतृत्व परेड कमांडर शैलेश काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, रोहा विभाग दुय्यम परेड कमांडर पोलिस उपनिरीक्षक शिवराज खराडे, क्यूआरटी पथक यांनी केले. या वेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
----------
पोलिसांचे संचलन
रायगड जिल्हा पोलिस सशस्त्र बल, दंगल नियंत्रण पथक, सशस्त्र महिला पोलिस दल, महाराष्ट्र अग्निशमन सेवा वाहतूक पोलिस दल, पोलिस ब्रास बॅण्ड पथक, होमगार्ड पथक, श्‍वानपथक, वज्र वाहन, फॉरेन्सिक वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथकांनी तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय १०८ रुग्णवाहिका आदींनी महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या पथसंचलनात सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com