निर्भीडपणे बजवा मतदानाचा हक्क !

निर्भीडपणे बजवा मतदानाचा हक्क !

निर्भीडपणे बजवा मतदानाचा हक्क!
मतदारांची सुरक्षा तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी पनवेल झोन दोनमधील प्रत्येक मतदान केंद्रांवर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय संवेदनशील म्हणून नोंद असलेल्या मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. संशयास्पद वाहनांची तपासणी सुरू आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान प्रत्येक केंद्रावर सेक्टर पोलिसिंग हजर राहतील. कोणाच्याही दबावाला बळी न पडता नागरिकांनी निर्भीडपणे घराबाहेर पडावे व मतदानाचा हक्क बजवावा, पोलिस तुमच्यासोबत आहेत.
-विवेक पानसरे, पोलिस उपआयुक्त परिमंडळ-२
........................
कर्तव्य म्हणून मतदान करा!
लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन भयमुक्त वातावरणात कर्तव्य म्हणून मतदान करावे. मतदारसंघात शंभर टक्के मतदान व्हावे, यादृष्टीने मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे. मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पुरवल्या आहेत. मतदान करा, लोकसभेच्या महोत्‍सवात सहभागी व्हा.
-राहुल मुंडके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल
...........................
राष्ट्रीय कर्तव्यासाठी पुढाकार घ्या!
संविधानाने आपल्याला एक समान मतदानाचा अधिकार दिला आहे. तो अधिकार वापरून आपले कर्तव्य बजावण्यासाठी कुठेही असला तरी मतदानाचे कर्तव्य बजवा आणि इतरांनाही मतदान प्रक्रियेत सहभागी करून लोकशाही बळकटीसाठी प्रोत्साहित करा. मी मतदान करणार आहे, तुम्हीही करा.
-डॉ. वैभव विधाते, उपायुक्त, पनवेल महापालिका
.........................
आपले अनमोल मत ‘दान’ करा!
पनवेल मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने यावेळी शत-प्रतिशत मतदान होईल. मतदारांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मतदान पथक व आरोग्य पथकासोबत औषधांची किट उपलब्ध आहे. मतदान केंद्रांवर सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी आपले अनमोल मत ‘दान’ करा.
-सीताराम मोहिते, गटशिक्षण अधिकारी, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com