प्रचारात गुंतले नाका कामगार

प्रचारात गुंतले नाका कामगार

प्रचारात गुंतले नाका कामगार
पक्षांकडून रोजंदारीवर नियुक्‍ती; पेड कार्यकर्त्यांची चांदी
पनवेल, ता. १ (बातमीदार) : मावळ लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचाराचा ज्वर वाढला असून प्रचाररॅली तसेच सभांसाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी जमविण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. प्रचार पत्रके वाटण्यासाठी तसेच रॅलीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात येत आहे. यामध्ये नाका कामगारांना अच्‍छे दिन आले आहेत. प्रचारासाठी त्‍यांची रोजंदारीवर नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर काही कार्यकर्त्यांना विशिष्ट रक्कम देऊन प्रचारात गुंतवण्यात आले आहे.
यंदाच्‍या निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांना पक्षाकडून काही रुपये भत्ता अन् दोन वेळचे जेवण दिले जात आहे. तर बहुतेक पक्षांकडून नाका कामगारांनादेखील निवडणुकीच्‍या प्रचारासाठी पसंती देण्यात येत आहे. पनवेल व कळंबोलीमध्ये वय व नीटनेटकेपणा पाहून ठराविक नाका कामगारांना हजेरीवर घेतले जात आहे. सध्या या कामगारांचा भाव वाढला असून विविध पक्षांकडून मागणी असल्याने सकाळी एका पक्षासोबत आणि सायंकाळी दुसऱ्या पक्षाचा प्रचार करण्यात ते व्यग्र होत आहेत. प्रचारात दोन पैसे अधिक मिळत असल्याने नाका कामगार, बांधकाम क्षेत्रातील मजूर मोठ्या संख्येने प्रचारात गुंतले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी शहर व ग्रामीण परिसरात नेत्याच्या जवळच्या पदाधिकाऱ्यांकडून अनेक नाका कामगारांची जमवाजमव करण्यात आली आहे. त्‍यांच्‍या जेवणाची व्यवस्थादेखील पक्षांकडून करण्यात येत आहे. झोपडपट्टी परिसरातील काही ठराविक महिला व पुरुषांना यासाठी बोलावले जात आहे. ग्रुप प्रमुखास निरोप मिळाल्यानंतर बाकीचे कामगार रॅलीसाठी तयार होतात. नियोजित स्‍थळी प्रचाराची टोपी, शेला, पत्रके अन् बॅनर घेऊन ते हजेरी लावतात. हे कामगार व गृहिणी नेहमी मतदानाची वाट पाहतात, असे नाव न छापण्याच्या अटीवर एका कामगाराने सांगितले. किमान निवडणुकीसाठी तरी आमचा उपयोग होतो, असे सांगण्यात आले. तसेच गर्दी जमविण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
...............................
कष्टाच्या कामापेक्षा हे काम उत्तम आहे. प्रत्येक निवडणुकीत आमच्या हाताला काम मिळते. पक्षांचे कार्यकर्ते आमची आस्थेने विचारपूस करतात. खाण्या-पिण्यापासून आमची सर्व व्यवस्था केली जाते.
-नाका कामगार, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com