गर्जा महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र माझा

गर्जा महाराष्ट्र माझा
ठाणे पालिकेसह जिल्हा परिषदेत महाराष्ट्र दिन साजरा; गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६४वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखाडी येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सात वाजून १५ मिनिटांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

ध्वजवंदनानंतर महापालिका आयुक्त राव यांच्या हस्ते, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. संध्या पवार, पुष्पा शेलार, छाया काकडे, महादेवी गंधनोर, सुषमा पवार, विठ्ठल बर्वे, परशुराम जाधव, तुषार रटाटे, संदीप करंजकर, उलिगप्पा शिवलिंग या सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केले. तसेच, शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, मनीष जोशी, उमेश बिरारी, तुषार पवार, सचिन पवार, शंकर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन
महाराष्ट्र दिनाच्या ६४वा वर्धापन दिनानिमित्त वागळे इस्टेट येथील जिल्हा परिषद ठाणे इमारतीच्या आवारात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन सकाळी करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. यावेळी रवींद्र तरे, धीरज भोईर, सुरेश जाधव, हरीश शेलार यांच्या शिक्षक युवा कलामंचमार्फत महाराष्ट्र गीत व ध्वज गीत सामूहिक गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल सूर्यवंशी यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com