मराठी चित्रपटांना न्याय द्यावा!

मराठी चित्रपटांना न्याय द्यावा!

मराठी चित्रपटांना न्याय द्यावा!
- मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे दादरमध्ये आंदोलन
कांदिवली, ता. १ (बातमीदार) ः अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या वतीने मंगळवारी (ता. ३०) सकाळी ९ वाजता भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या हिंदमाता दादर येथील पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. मराठी चित्रपटांवर सुरू असलेला अन्याय दूर करावा, यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच सह्यांची मोहीमदेखील राबवण्यात आली.
निर्माता महामंडळाचे संस्थापक-अध्यक्ष देवेंद्र मोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्‍या आंदोलनात विनोद डवरे, विजय शिंदे, संजय दीक्षित, डॉ. राकेश कुमार, महेश बनसोडे, डॉ. सुहास राणे, प्रवीण भगत, रुपेश शिरोळे, रामचंद्र चव्हाण, अविनाश कुडचे, डॉ. कुंडलिक केदारी, अमर शेलार, गणेश पिल्लाई, अनिल होळकर, विजयभाऊ पाटील, चित्रपट निर्माते, चित्रकर्मी, रंगकर्मी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
कोविड काळातील अपात्र चित्रपटांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि त्यांना पात्र करून सरसकट अनुदानाचे वाटप करावे, मराठी चित्रपट अनुदान परिक्षण न करता प्रोत्साहन म्हणून पाहावे आणि सरसकट अनुदान द्यावे, चित्रपट निर्मात्‍यांना परफॉर्मन्स रॉयटी मिळावी, अनुदान प्रस्तावातील जाचक अटी व शर्ती रद्द कराव्यात, चॅनेल्सने मराठी डब चित्रपट प्रदर्शित करणे बंद करावे, गाण्यांच्या चॅनेल्सवर मराठी चित्रपटांची गाणी दाखविणे बंधनकारक करावे, मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांची नियमावली बदलावी, वी.पी.एफ चार्जेस घेऊ नये, शासनाच्या चित्रपट धोरण समितीवर निर्माता महामंडळाचे दोन प्रतिनिधी घेण्यात यावेत, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन केल्याचे अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com