पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांना दिलासा

पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांना दिलासा

पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः माटुंगा पोलिस ठाण्यात तैनात असताना पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे यांच्यावर दाखल करण्यात आलेला जुगाराचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खरमाटे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२०१९ च्या विश्वचषकदरम्यान ज्ञानेश्वर खरमाटे हे माटुंगा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र खरमाटे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. आपल्यावर जबरदस्तीने आरोप लावण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता. विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान माटुंग्यातील एका हॉटेलमध्ये बेटिंग सुरू होती. पोलिस उपनिरीक्षक खरमाटे यांच्यावर हॉटेलमध्ये जुगार खेळल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे हे सध्या घाटकोपर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com