प्रदूषण व वातावरण थंड ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करा

प्रदूषण व वातावरण थंड ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करा

प्रदूषण व वातावरण थंड ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करा
ग्रीन सोल फाऊंडेशनची आयुक्तांकडे मागणी
तुर्भे, ता. १ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सध्या नवी मुंबईचे तापमान ४२ अंशांच्या पलीकडे गेले आहे; तर दुसरीकडे प्रदूषणही वाढले आहे. या दोन्ही गोष्टींच्या त्रासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत ग्रीन सोल फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय भुजबळ व उपाध्यक्ष सुभाष म्हात्रे यांनी आयुक्तांना भेटून प्रदूषण रोखण्यासाठी व वातावरण थंड ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करावी, अशी मागणी केली आहे.
महापालिकेकडे असलेल्या दोन धूळ नियंत्रक वाहनांद्वारे नवी मुंबईतील मुख्य रस्ते प्रक्रियाकृत पाणी वापरून स्वच्छ केले जात आहेत. मात्र काही दिवस पालिकेने हे कार्य केल्यावर पुन्हा त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या वाहनातील स्प्रेयर प्रणालीद्वारे हवेतील धूलिकणांची सफाई थंडावली आहे. सध्या विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे हवेत धूलिकण वाढले आहेत. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे, तर पुढील महिनाभर ४२ अंश तापमान राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने पाण्याची फवारणी करणे आवश्यक आहे. यामुळे शहरात लोकांबरोबर झाडांनादेखील काही प्रमाणात थंडावा मिळू शकतो. त्‍यामुळे संस्‍थेकडून आयुक्‍तांना शहरात पाण्याची फवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com