तीव्र उन्‍हाळ्यामुळे नारळ पाण्याच्‍या मागणीत वाढ

तीव्र उन्‍हाळ्यामुळे नारळ पाण्याच्‍या मागणीत वाढ

तीव्र उन्‍हाळ्यामुळे नारळ पाण्याच्‍या मागणीत वाढ
आरोग्यासाठी लाभदायक; ४० ते ७० रुपयांपर्यंत विक्री
पनवेल, ता. १ (बातमीदार) : सध्या पारा चाळिशी पार गेला असून अनेकांना उष्म्याचा त्रास होऊ लागला आहे. त्‍यामुळे शरीराला थंड ठेवण्यासाठी पनवेलकर सध्या नारळ पाण्याला पसंती देत आहे. शहरामध्ये गेल्‍या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर शहाळ्यांची विक्री होत असून त्‍याच्‍या किमतीमध्येदेखील वीस ते तीस टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.
उन्हाच्या झळा वाढल्याने फळांनाही मागणी वाढली आहे. बाजारपेठेतही सध्या नारळ पाण्याला पसंती मिळत असून शहरात ठिकठिकाणी नारळ पाण्याचे स्टॉल पाहायला मिळत आहेत. भरदुपारी रस्त्याने फिरताना नागरिक रसवंती, नीरा, ज्यूस स्‍टॉलवर गर्दी करताना दिसत आहेत. तर अनेकजण आजारपणाला आमंत्रण नको म्हणून नारळ पाणी पिण्याला प्राधान्य देत आहेत. नारळ पाणी आरोग्यासाठी गुणकारी असून त्‍यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्‍ही कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, अमिनो अॅसिड, अक्राईम्स आदी आरोग्यासाठी फायदेशीर असे घटक आढळतात. त्यामुळे बाहेरील शीतपेय पिण्यापेक्षा लाभदायक असे नारळ पाणी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्यामुळे नारळ विक्रेत्यांकडेही यंदा मोठ्या प्रमाणावर नारळ विक्रीसाठी आणण्यात आले आहेत.
................
चौकट
किमतीमध्ये वीस टक्‍क्‍यांची वाढ
नारळाला मागणी वाढल्याने महामार्ग, शहरातील चौक, रस्त्याच्या कडेला नारळ विक्रेत्यांकडे गर्दी दिसून येत आहे. अगदी ४० रुपयांपासून ते ७० रुपयापर्यंत नारळ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पाणीदार नारळासह मलईयुक्त नारळाचा आस्वाद घेण्यात येत आहे.
................................
कोट
नारळ पाणी प्यायल्याने शरीराला इलेक्ट्रोलाईट घटक मिळतात. नारळ पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. नारळ पाणी प्यायल्‍याने शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. दररोज नारळ पाणी प्यायल्यास कोणत्याही अन्य औषधांची गरज पडत नाही. म्हणून निदान उन्हाळ्यात याचा आस्वाद घेतला पाहिजे.
-डॉ. बाळासाहेब खडबडे, यशोदा हॉस्पिटल, कामोठे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com