क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये कॉर्डियाक केअर युनिट सुरू

क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये कॉर्डियाक केअर युनिट सुरू

खर्डी, ता. २ (बातमीदार) : शहापूर तालुक्याच्या ठिकाणी हृदयरोगावर तत्काळ उपचार मिळू न शकल्याने अनेकांचे जीव गेले आहेत. यापुढे हृदयरोगावर तत्काळ उपचार मिळून रुग्णांना आपला जीव गमवावा लागू नये, यासाठी आसनगाव येथील क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये प्रथमच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कॉर्डियाक केअर युनिटचे उद्‌घाटन डॉ. विलास सुरोशे यांच्या हस्ते करण्यात आले.
शहापूर तालुक्यातच आता एंजिओग्राफी व एंजिओप्लास्टी सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. तसेच शासकीय योजनेत या शस्रक्रिया समाविष्ट करून लवकरच मोफत करण्यात येणार असल्याची माहिती क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अमोल गीते यांनी दिली. यावेळी क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अमोल गीते, डॉ. भरत जैन, डॉ. प्रवीण कांगणे, सुमित बागुल, किरण सोकांडे यांच्यासहीत तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com