भाजपात कुठलीही नाराजी नाही : उपाध्ये

भाजपात कुठलीही नाराजी नाही : उपाध्ये

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १ : शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून ठाणे लोकसभेवर दावा करण्यात येत होता. अखेर ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्याने काही प्रमाणात भाजपत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. अशातच जोपर्यंत जागेचा निर्णय झाला नव्हता तोपर्यंत पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दावा करणे, यात काही गैर किंवा चुकीचे नसल्याचे सांगत, ठाणे भाजपत कुठल्याही प्रकारची नाराजी नसल्याचा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला. तसेच आता ठाणे लोकसभेचा निर्णय झाला असल्याने आम्ही जोमाने कामाला लागू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र दिनानिमित्त महाविकास आघाडी सरकारने विकासात्मक कामात अडसर आणि केलेल्या महाराष्ट्र द्रोहाचा पाढा वाचण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, मनोहर सुखदरे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे लोकसभेचा उमेदवार ठरला असला तरी आमचे उमेदवार नरेंद्र मोदी असल्याने त्यांना निवडून आणायचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. महाविकास आघाडीतच बिघाडी असल्याचे चित्र या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, कॉंग्रेस किंवा उद्धव ठाकरे गट असेल यांनी परस्पर उमेदवार दिल्याने त्यांच्यात बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीत सुरुवातीला दावा केला जात असला तरी उमेदवार जाहीर झाल्यानंतर पक्षात कोणीही नाराज झाला नसल्याचे त्यांनी सांगितले, आम्ही एकदिलाने काम करीत असल्याचेही ते म्हणाले.

...
शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केली
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अडीच वर्षांत मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड असे महाराष्ट्राच्या विकासाचे प्रकल्प बंद करून महाराष्ट्राशी द्रोह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शरद पवार यांना लोकसभा निवडणुकीत मतदारांनी धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेला खतपाणी घालून शरद पवार यांनी राज्यात अस्थिरता निर्माण केली असल्याचा आरोपदेखील उपाध्ये यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com