महाराष्ट्रदिनी रोडपालीत संयुक्त जयंती साजरी

महाराष्ट्रदिनी रोडपालीत संयुक्त जयंती साजरी

कळंबोली, ता. १ (बातमीदार) : महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून रोडपाली येथील सिडकोच्या हंसध्वनी सोसायटीने सर्व महापुरुषांची संयुक्त जयंती बुधवारी (ता. १) मोठ्या उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर ढोल-ताशाच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. यानिमित्त आरोग्य शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिवसभर होती.
महाराष्ट्राला महापुरुषांचा थोर वारसा लाभलेला आहे. या सर्वांची वेगवेगळी जयंती साजरी करणे वस्तुतः शक्य नव्हते. यासाठी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संयुक्त जयंती साजरी करण्याचा निर्णय हंसध्वनी सोसायटीने घेतला होता. यानिमित्त सर्व समाजाचे नागरिक एक कुटुंब म्हणून एकत्र येतील. सोसायटीत एकोप्याचे वातावरण तयार होईल, अशी भावना हंसध्वनी कला व क्रीडा मंडळ आणि हंसध्वनी गृहसंकुल को. ऑप. हौसिंग यांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष सचिन बोराटे, उपाध्यक्ष परमानंद सावंत, सचिव नीलेश जगताप, खजिनदार रवी पवार, सहखजिनदार सचिन क्षीरसागर आणि मंडळाचे इतर सदस्यांनी मेहनत घेतली. तसेच सोसायटीचे अध्यक्ष खेमाजी गावडे, सचिव ॲड. अभिजित धुमाळ, सदस्य किरण नेवसे यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी आरोग्य शिबिरात सुमारे २०० ते ३०० नागरिकांची तपासणी करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास लहान मुलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. उन्हाळी सुटी असल्याने मुलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.


कळंबोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com