कर्ज घोटाळाप्रकरणी‘रोझरी’ला दणका

कर्ज घोटाळाप्रकरणी‘रोझरी’ला दणका

कर्ज घोटाळा प्रकरणी‘रोझरी’ला दणका
मुंबई, ता. १ ः सेवा विकास सहकारी बँकतील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणात पुण्याच्या रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार असलेल्या विनय अरान्हा याला दिलासा देण्यास सत्र न्यायालयाने नकार दिला. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. एम.जी देशपांडे यांनी अरान्हाचा जामीन अर्ज फेटाळून लावला. पुण्याच्या रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार असलेल्या विनय अरान्हा याने बनावट कागदपत्रांचा वापर करून पुणे येथील कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवले.४२९ कोटींच्या या आर्थिक अफरातफरीमध्ये अरान्हाच्या सहभाग असल्याच्या आरोपातून ईडीने त्याला अटक केली. त्यामुळे या प्रकरणी जामीनासाठी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. त्यावर न्या. एम. जी. देशपांडे यांनी निर्णय जाहीर करताना अरान्हाला दिलासा देण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com