वालधुनी पात्रातील अतिक्रमणविरोधात उपोषण

वालधुनी पात्रातील अतिक्रमणविरोधात उपोषण

अंबरनाथ, ता. २ (बातमीदार) : वालधुनी उपनदीच्या पात्रात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधात महाराष्ट्र दिनी उपोषण करण्यात आले; मात्र पालिका प्रशासनाने दखल घेतल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. अंबरनाथच्या पूर्वेकडील वालधुनी उपनदीपात्रात अतिक्रमण सुरू आहे. याविरोधात मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला लेखी पत्र दिले होते. बांधकाम थांबवण्याच्या मागणीसाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम राबवली होती, त्यावेळी नदीपात्रात सुरू असलेले काम थांबवण्यात येत असल्याचे पत्र प्रशासनाने दिले होते; मात्र तरीही संबंधित ठेकेदाराने काम सुरू ठेवल्याने शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनी उपोषण करण्यात आले.

दरम्यान, जिल्हास्तर नगरोथानअंतर्गत लोकनगरी स्मशानभूमीजवळील नाल्याला रिटेनिंग भिंत बांधण्याचे काम करण्याची परवानगी ठेकेदाराला दिली होती; मात्र नाल्याची रुंदी कमी करून बांधकाम करण्यात येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीची दखल पालिका प्रशासनाने घेतली. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत बांधकाम तूर्त त्वरित थांबवण्याचे आदेश पालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित ठेकेदाराला दिले होते. या आंदोलनात माजी नगरसेवक स्वप्नील बागुल, धनंजय गुरव आदी पदाधिकारी उपोषणात सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com