प्लास्टर कोसळल्याने एक जण जखमी

प्लास्टर कोसळल्याने एक जण जखमी

ठाणे, ता. २ (वार्ताहर) : कोपरी गावदेवी मंदिर परिसरातील ४० ते ५० वर्षे जुन्या असलेल्या शारदा भवन या तीन मजली इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकेचे प्लास्टर कोसळून तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. ३०) मध्यरात्री घडली.

इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रूम नंबर तीन श्रीमती सरोजिनी मुर्तुडकर यांच्या सदनिकेतील छताचे प्लास्टर मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास कोसळले. यात अनिकेत मुर्तुडकर (२१) यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. ही इमारत शैलेश शर्मा यांच्या मालकीची असून इमारतीत एकूण २२ सदनिका असून त्यातील १० ते १२ सदनिकांमध्ये प्लास्टरला व कॉलमला तडे गेल्याने रहिवासी धास्तावले आहेत. सद्य:स्थितीत रूम नंबर तीनमधील राहणाऱ्या तीनही रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. तात्पुरत्या स्वरूपात त्यांना दुसऱ्या ठिकाणी राहण्यास सांगितले आहे.

घटनास्थळी ठाणे पालिकेच्या बांधकाम विभागाचे उपनगर अभियंता व उपअभियंता, अग्निशमन दलाचे जवान, इमर्जन्सी टेंडर, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, तसेच कोपरी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच, इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश इमारत मालक व रहिवाशांना दिले. स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानंतर इमारतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, शारदा भवन इमारतीचे मालक शर्मा बंधु यांच्याकडून सदनिकांच्या दुरुस्ती आणि डागडुजीबाबत नेहमीच अडवणूक केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, स्ट्रक्चरल ऑडिटनंतरच इमारतीवरील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती घटनास्थळी भेट दिलेल्या ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com