खारघरमध्ये सांडपाणी तुंबल्याने गटारे तुंबली

खारघरमध्ये सांडपाणी तुंबल्याने गटारे तुंबली

खारघरमध्ये सांडपाण्यामुळे गटारे तुंबली
खारघर, ता. २ (बातमीदार) : खारघर सेक्टर १९, मुर्बी गाव आणि वसाहतीमधील खाडीत सोडण्यात आलेल्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गटारे तुंबली आहेत. पालिकेने दुर्लक्ष केल्यास पावसाळ्यात सांडपाणी गावात पसरण्याची भीती व्‍यक्‍त करण्यात येत आहे. पालिकेने वेळीच लक्ष केंद्रित करून सांडपाणी समस्या दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
खारघर सेक्टर १९, मुर्बी गाव आणि परिसरातील वसाहतीमधील सांडपाणी खाडीत सोडले जात आहे. दरम्यान, मुर्बी गावालगत रस्त्यावरील सर्कलवर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करताना गटारे तोडण्यात आली आहेत. त्‍यामुळे गाव आणि वसाहतीमधील सांडपाणी योग्यप्रकारे खाडीमध्ये निचरा होत नसल्‍याने ते तुंबले आहे. गटारे तुंबल्याने मलनिस्सारण वाहिनीला तलावाचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे तुंबलेल्या सांडपाण्यामुळे मासळीदेखील मरून पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे पुढील महिन्यात पावसाळा सुरू होणार आहे. पालिकेने सांडपाणी समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास पावसाळ्यात सदर सांडपाणी गावात पसरण्याची भीती व्‍यक्‍त केली जात आहे.

............................
खाडीत वाहून जाणाऱ्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गावालगत असलेल्या गटाराला तलावाचे स्वरूप आले आहे. पालिकेने दुर्लक्ष केल्यास पावसाळ्यात गावात सांडपाणी शिरण्याची भीती आहे.
- राजेश म्हात्रे, ग्रामस्थ, मुर्बी गाव
.................
मलनिस्सारण केंद्रातून पाणी उपसा होत नसावा, त्यामुळे सांडपाणी निचरा होत नाही. सदर काम हे सिडकोचे आहे. मात्र घटनास्थळी पाहणी करून योग्य ती उपाययोजना केली जाईल.
- प्रीतम पाटील, एसटीपी प्रमुख, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com