आधार हाऊसिंगचा किंमतपट्टा जाहीर

आधार हाऊसिंगचा किंमतपट्टा जाहीर

मुंबई, ता. २ : घर खरेदीसाठी कर्ज देणाऱ्या आधार हाऊसिंग फायनान्स लि. च्या आयपीओसाठी ३०० ते ३१५ रुपये किंमतपट्टा जाहीर करण्यात आला आहे. या इशूसाठी ८ ते १० मे दरम्यान गुंतवणूक करता येईल; तर बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना सात मे रोजी बोली लावता येईल.

यासाठी गुंतवणूकदारांना किमान ४७ शेअरसाठी व त्यापुढे ४७ च्या पटीतच मागणी नोंदवावी लागेल. या निधीतून कंपनीतर्फे यापुढे गृहखरेदीदारांना कर्जे दिली जातील. तसेच कंपनीच्या सर्वसाधारण उद्दिष्टांसाठीदेखील हा निधी वापरला जाईल. या इशूपैकी ५० टक्के शेअर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील; तर पंधरा टक्के शेअर बड्या बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांना मिळतील. ३५ टक्के शेअर सामान्य गुंतवणूकदारांना मिळतील. बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांखेरीज अन्य गुंतवणूकदारांना एएसबीए पद्धतीने गुंतवणूक करावी लागेल.

कंपनीने तीन-चार वर्षांपूर्वी डिजिटायझेशन सुरू केले असून वर्षभरात त्यांचा करोत्तर नफा ३५ टक्क्यांनी वाढला आहे. त्यांची बुडीत थकीत कर्जे (एनपीए) देखील डिसेंबर अखेरीस जेमतेम १.४ टक्के एवढीच आहेत. घर खरेदी, तसेच घर दुरुस्ती, सजावट, विस्तार यासाठी देखील कंपनीतर्फे कर्जे दिली जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com