भिवंडीतून मविआ उमेदवाराचा अर्ज

भिवंडीतून मविआ उमेदवाराचा अर्ज

भिवंडी, ता. २ (बातमीदार) : लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश गोपीनाथ म्हात्रे ऊर्फ बाळा मामा यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख, काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, आरपीआय सेक्युलर पक्षाचे प्रदेश चिटणीस अॅड. किरण चन्ने, उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रूपेश म्हात्रे, राष्ट्रवादी (श.प.) शहराध्यक्ष शोयब गुड्डू आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com