महिला मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा

महिला मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा

ठाणे, ता. २ (वार्ताहर)ः घरकाम करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा टीएमटी बसमधून उतरताना चालकाच्या चुकीमुळे तोल गेल्याने मृत्यू झाला होता. नितीन कंपनी परिसरात २५ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेत बुधवारी (ता. १) नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागळे पश्चिमेकडील अंबिका नगर परिसरात राहणारे सुरेश खरीवले यांची आई स्वयंपाकाची कामे करतात. २५ एप्रिल रोजी सुरेखा खरीवले ठाणे पालिकेच्या प्रवासी बसमधून नितीन कंपनी जंक्शन बसस्टॉपवर खाली उतरत असताना धक्क्याने तोल जाऊन खाली पडल्या होत्या. यावेळी बस अंगावरून गेल्याने त्यांच्या हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती, पण मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com