प्रतिभा पाध्ये यांचा 
बविआमध्ये प्रवेश

प्रतिभा पाध्ये यांचा बविआमध्ये प्रवेश

विरार, ता. २ (बातमीदार) : पालघर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असताना आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस बाकी असताना भाजपला धक्का बसला आहे. या पक्षाच्या प्रदेश मच्छीमार सेलच्या प्रदेश सचिव प्रतिभा पाध्ये (वैती) यांनी कार्यकर्त्यांसह आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत गुरुवारी (ता. २) प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांत प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर वसई पूर्वेकडील भाजपच्या नेत्या, ठाणे-पालघर जिल्हा उपाध्यक्षा प्रतिभा पाध्ये वैती यांनी पक्षांतर केले. त्यांच्याबरोबर हिंदू सेवा संघाचे सुरेश माकिजा, कैलास जाधव, लक्ष्मीबाई महिला मंडळ आणि नारी सशक्तीकरण संघटनेच्या महिलांनीही प्रवेश केला. प्रवेशावेळी माजी महापौर नारायण मानकर, माजी नगराध्यक्ष मुकेश सावे, प्रकाश वनमाळी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघरच्या विकासाचे व्हिजन हे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असल्याने आणि त्यांच्या कामाची पद्धत आवडल्याने बविआमध्ये प्रवेश करत आहे. कोणत्याही पदाची अपेक्षा न करता हा प्रवेश करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com