मिरा-भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मिरा-भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

भाईंदर, ता. २ (बातमीदार) : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिरा- भाईंदर भाजपमध्येही नाराजी पसरली आहे. ही जागा भाजपला न मिळाल्याने भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. जिल्हा महासचिव ध्रुवकिशोर पाटील, सरचिटणीस दयानंद शिर्के, उपाध्यक्ष सुनील केसरी, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष एजाज खातीब, युवा मोर्चाचे महासचिव विशाल पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्याकडे आपले राजीनामे दिले. त्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आलेले नाहीत. या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही पदाचे राजीनामे दिले आहेत, मात्र पक्षाचे काम करतच राहू, अशी प्रतिक्रिया ध्रुवकिशोर पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com