मतदान केल्याची निशाणी दाखवा अन् डिस्काऊंट मिळवा

मतदान केल्याची निशाणी दाखवा अन् डिस्काऊंट मिळवा

उल्हासनगर, ता. ११ (बातमीदार) : व्यापाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दुकानात येणाऱ्या ग्राहकांमध्ये मतदान जागृती करावी, अशी हाक पालिकेने दिली होती. या हाकेला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत, ग्राहकांनी मतदान केल्याची निशाणी दाखवल्यावर त्यांना विविध वस्तूंवर ५ ते १० टक्के सवलत देण्याचा आगळावेगळा निर्णय घेतला आहे.
मतदान जनजागृती करण्यासाठी व्यापाऱ्यांसोबत उल्हासनगर पालिकेने बैठक घेतली होती. त्यात दुकानात महापालिकेने तयार केलेले स्टिकर्स लावून आणि येणाऱ्या ग्राहकांना स्टिकर्स देऊन जनजागृती करावी; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती मोहिमेत सहभागी व्हा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने जे मतदार मतदान केल्याची निशाणी बोटावर दाखवतील. त्यांना विविध वस्तूंवर ५ ते १० टक्के डिस्काऊंट देण्याचा आगळावेगळा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जगदीश तेजवानी यांनी दिली. या वेळी सहायक आयुक्त गणेश शिंपी, अनिल खतुरानी, दत्तात्रय जाधव, व्यापारी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष जगदीश तेजवानी, नरेश थरवानी, दिनेश कुंग, महेश पुरस्वानी, किशोर सजनानी, दिलीप शर्मा, अजय चिमनानी, सनी जाधवानी, जयकिशन पारवानी, दीपक छतलानी यांच्यासह छाया डांगळे, निवडणूक विभागाचे विशाल कदम, अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या जनजागृती प्रचार सभेत सहभाग घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com