चित्रपट समाज शिक्षणाचे महत्त्वाचे माध्यम

चित्रपट समाज शिक्षणाचे महत्त्वाचे माध्यम

विरार, ता. ११ (बातमीदार) : ग्रामीण भागातील तरुणांना आजही सिनेमाची क्रेज आहे. सिनेमातील हिरो हा एकावेळी अनेक व्हिलनला मारतो, हे बघून त्या हिरोसारखे व्हावे, हिरोईनच्या मागे धावणे असे करतानाच आपणही सिनेमातील हिरो व्हावे, असे वाटते. स्वप्ननगरीतील हा सिनेमा वास्तवात पाहणे, ही एक कला आहे. त्याची जादू कळलेले लोक फार कमी आहेत, ती सांगायला मी इथे आलो आहे. चित्रपट फक्त करमणुकीचे माध्यम नसून समाज शिक्षणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले.

अशोक राणे यांनी नवसारी येथील आपल्या बालपणाविषयी बोलताना नाटकाची आवड असणाऱ्या जरायु स्वामींची गोष्ट सांगितली. त्यांच्याकडे नाटक पाहायला मी जात असे. येताना फाटके असलेले कामगार बघता बघता युधिष्ठिर, दुर्योधन व्हायचे, हा बदल ती जादू अजूनही ओसरलेली नाही. दिग्दर्शकाची दृष्टी कशी असते, हे सांगताना त्यांनी ‘मोहब्बतें’ आणि ‘डेड पोएट’ सोसायटी या चित्रपटांतील एका दृश्याशी तुलना करून स्पष्ट केली. ‘डेड पोएट’चा दिग्दर्शक मुलांच्या हातात ‘प्लेबॉय’ हे मासिक दाखवतो; परंतु त्यातील एकही चित्र दाखवत नाही. त्या उलट ‘मोहब्बतें’मध्ये ‘प्लेबॉय’मधील चित्रे दाखवली. हा दृष्टीतील, वृत्तीतील फरक आहे. चांगला दिग्दर्शक प्रेक्षकांवर काही गोष्टी सोडून देतो, असे प्रतिपादन राणे यांनी नालासोपारा येथे संजीवनी व्याख्यानमालेत केले. ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, चित्रपट फक्त करमणुकीचे माध्यम नसून समाज शिक्षणाचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. चित्रपट पाहणे ही एक कला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैमुनी पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप म्हात्रे होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com