सिडकोच्या कॉर्पोरेट मैदानात अस्वच्छता

सिडकोच्या कॉर्पोरेट मैदानात अस्वच्छता

सिडकोच्या कॉर्पोरेट मैदानात अस्वच्छता
खारघर, ता. ११ (बातमीदार) : सिडकोच्या कॉर्पोरेट मैदानावर अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
खारघरमधील सिडकोच्या कॉर्पोरेट पार्कमधील मैदानात २१ से २५ फेब्रुवारीदरम्यान अखिल विश्व गायत्री परिवारातर्फे अश्वमेध महायज्ञ मोठ्या उत्साहात पार पडला होता. या महायज्ञात देशातील विविध भागांतील भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होणार असल्यामुळे कार्यक्रमापूर्वी दोन महिन्यांपासून मैदान साफसफाईच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. सदर परिसर स्वच्छ झाल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत होते. विशेष म्हणजे सेंट्रल पार्क, कार्पोरेट पार्क परिसरातील मोकळ्या जागेत खारघरवासी सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी आणि व्यायामासाठी जात असतात. महायज्ञ झाल्यावर सदर मैदानाची स्वच्छता करणे आवश्यक होते. मात्र मैदानात काही ठिकाणी माती, विटांचे ढिगारे, होर्डिंग्ज, बँनर, प्लास्टिक पिशव्या आणि स्वच्छतागृहाचे मोडकळीस आलेली भांडी अस्ताव्यस्त पडून आहेत. तसेच मैदानात अस्वच्छता पसरल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. याविषयी गायत्री महायज्ञाचे पदाधिकारी मीनल मिथल यांच्याशी संपर्क केला असता, संबंधित विभागाकडे विचारणा केली जाईल, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com