मुंबई उपनगरात टपाली मतदानाची तयारी सुरू

मुंबई उपनगरात टपाली मतदानाची तयारी सुरू

मुंबई उपनगरात टपाली मतदानाची तयारी सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० :  मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण सहा लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघात अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी १४, १५ आणि १६ मे रोजी तीन दिवस टपाली मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदारसंघातील नोंदणीकृत मतदारांपैकी अत्यावश्यक सेवेतील पोलिस अधिकारी कर्मचारी, अग्निशमन दल, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना १२ /१२ ड आणि ईडीसी कार्यप्रमाण पत्रकारिता नमुना १२ अ मध्ये अर्ज केला होता. जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले आहेत, अशा पात्र कर्मचाऱ्यांना ईडीसी प्रमाणपत्र वितरण करणे. नमुना १२ अ/ नमुना १२ ड भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या मतदारांना टपाली मतपत्रिका वितरित करून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर मतदानाची सुविधा १४ ते १६ मेदरम्यान सलग तीन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत उपलब्ध करण्यात आली आहे. 
दरम्यान मुंबई उत्तर-पूर्व मतदारसंघातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विक्रोळी येथील कार्यालयात १४ ते १६ मे या कालावधीत टपाली मतदान केंद्र कार्यरत असणार आहे; तर निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विक्रोळी येथील कार्यालयात १७ ते १९ मे या कालावधीत मतदार सुविधा केंद्र कार्यरत असणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com