‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती

‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती

‘वंदे भारत’ला प्रवाशांची पसंती
दोन कोटी १५ लाख प्रवाशांनी केला प्रवास; लवकरच धावणार मुंबई- कोल्हापूर वंदे भारत ट्रेन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : देशभरात वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची चांगली पसंती मिळत आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत दोन कोटी १५ लाख प्रवाशांनी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास केला आहेत. यामध्ये सध्या कार्यरत वंदे भारतची प्रवासी क्षमताही वाढविण्यात आली आहे. तसेच आता लवकरच यात मुंबई ते कोल्हापूर या वंदे भारत ट्रेनची भर पडणार आहे. यांसंदर्भात रेल्वेकडून नियोजन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोईसुविधा, आरामदायी प्रवास द्यावा, या दृष्टीने भारतीय रेल्वेने मेड इन इंडियाअंतर्गत देशभरात हायस्पीड वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहे. या सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे. सध्या देशभरात १०२ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. ३१ मार्च २०२४ पर्यंत २ कोटी १५ लाख प्रवाशांनी वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास केला आहे. ७ मे रोजी देशभरातील वंदे भारतची प्रवासी आरक्षणाची टक्केवारी ९८ टक्के इतकी होती. चालू आर्थिक वर्षात ७ मेपर्यंत सरासरी आरक्षण दर १०३ टक्के आहे. यावरून वंदे भारतला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होते. सध्या वंदे भारत देशातील २८४ जिल्ह्यांतून धावतात.

प्रवाशांची वाढती मागणी
मुंबई ते कोल्हापूर दरम्यान सध्या महालक्ष्मी आणि कोयना एक्स्प्रेस धावत आहेत. सह्याद्री एक्स्प्रेस बंद झाल्यापासून या दोनही एक्स्प्रेसला प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. त्यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत आहे. या मागणीचा विचार करत रेल्वेने या मार्गावर वंदे भारत चालविण्याचे नियोजन सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत ट्रेन धावण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com