‘अपुऱ्या’ निकालाविषयी असमाधान

‘अपुऱ्या’ निकालाविषयी असमाधान

‘अपुऱ्या’ निकालाविषयी असमाधान
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दाभोलकर हत्येच्या निकलावर प्रतिक्रिया

धारावी, ता. १० (बातमीदार) : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची थेट हत्या करणाऱ्या सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना विशेष सीबीआय न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा केली. मात्र, या खटल्यातील इतर तीन आरोपींना न्यायालयाने मुक्त केले आहे. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने या ‘अपुऱ्या’ निकालाचे अंशतः स्वागत करत असतानाच असमाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र पोलिस आणि सीबीआय यांनी दहा वर्षे प्रदीर्घ तपास करून दोन गुन्हेगारांना शिक्षा घडवण्यात यश मिळवले आहे. मात्र, त्यासाठी त्यांना कर्नाटक पोलिसांच्या कर्तबगारीचा आसरा घ्यावा लागला. कर्नाटक पोलिसांच्या तपासाच्या आधारे दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधारांना शोधून जेरबंद करता येणे शक्य होते. त्या बाबतीत तपास यंत्रणांनी प्रामाणिक आणि कार्यक्षम कामगिरी केलेली नाही. प्रशासनावरील सनातन संस्थेच्या दबावामुळे हे झाले आहे का, याविषयीच्या संशयाचे निराकरण संबंधित यंत्रणांनी केले पाहिजे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. दरम्यान न्यायालयाच्या या अपुऱ्या निकालात सुधारणा करण्यासाठी शासनाच्या वतीने तातडीने उच्च न्यायालयात अपील करण्यात यावे, असे आवाहन ‘माकप’ने केले असल्याचे पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटीचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com