सरकार पक्षाने अपिलात जावे

सरकार पक्षाने अपिलात जावे

सरकार पक्षाने अपिलात जावे
दाभोलकर हत्येच्या निकालप्रकरणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीची मागणी


मुंबई, ता. १० : सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या खटल्याचा पुण्याच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. या निकालावर आम्ही व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीतील कार्यकर्ते समाधानी नाही. सरकारी पक्षाने या निकालावर अपिलात जावे, तसेच या गुन्ह्यातील मास्टरमाईंड हा शोधावाच लागेल आणि त्याला शिक्षाही झालीच पाहिजे, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते अविनाश कदम व विजय मांडके यांनी केली आहे.

डॉ. दाभोलकर कुटुंबीयांना याप्रकरणी न्यायालयाचे दार ठोठवावे लागते. यातच तपास यंत्रणेचे अपयश आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये तपास यंत्रणांचा एखाद्या सामान्य खून खटल्यात ज्याप्रमाणे तपास केला जातो, त्याच पद्धतीने यात केला गेला. हा तपास मुळात चुकीच्या पद्धतीने झाला आहे. कारण डॉ. नरेंद्र दाभोलकर हे विषम व्यवस्था परिवर्तनाची विशिष्ट विचारधारा घेऊन चाललेले होते आणि त्यांचा खून हा त्यांच्या विरोधातील सनातन प्रवृत्तींनी केला आहे. तपास यंत्रणांनी या संदर्भाचा विचारच केला नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालाचा विचार करता यातील मुख्य सूत्रधार पूर्णपणे सुटलेले दिसत आहेत. तपास यंत्रणांनी व त्या त्या वेळच्या सरकारांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. याचाच परिणाम हा या निकालावर झालेला दिसून येतो. त्यामुळे सरकारी पक्षाने यात वेळ न घालवता अपिलात जावे, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीने एका पत्रकाद्वारे केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com