कोकणकन्येतून पडून प्रवाशाचा मृत्यू

कोकणकन्येतून पडून प्रवाशाचा मृत्यू

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. १०) दादर रेल्वे स्थानकावर घडली. अमित पवार असे मृत तरुणांचे नाव असून या घटनेनंतर प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त करत मुंबई शहरातून कोकणासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित पवार हे कांदिवलीतील चारकोप परिसरात वास्तव्यास होते. गावी जाण्यासाठी गुरुवारी त्यांनी कोकणकन्या एक्स्प्रेसचा पर्याय निवडला. आरक्षण न मिळाल्याने त्यांनी जनरल डब्यातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोकणकन्या फलाट क्रमांक ११ वर येताच अमित यांनी जनरल डब्याकडे धाव घेतली; परंतु जनरल डब्यात प्रचंड गर्दी असल्याने त्यांनी डब्याच्या दरवाजावरील पायदानावर लटकत प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मात्र यामध्ये गाडीने वेग घेताच त्यांचा तोल गेला आणि फलाटाच्या टोकावर पडले. यामध्ये गाडीच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

..
जिवावर उदार होऊन प्रवास करू नका!
उन्हाळी सुटीनिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. कोकणात जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांनी मेल-एक्स्प्रेसच्या दरवाज्यात लटकून प्रवास करत आहे. अनेकदा प्रवासी संघटनेने रेल्वे गाड्यांच्या गर्दीसंदर्भात गाऱ्हाणे मांडले होते; मात्र याकडे लक्ष देण्यात आले नाही. प्रवाशांनीही जिवावर उदार होऊन प्रवास करू नये. गाडीत खरेच जीवघेणी गर्दी असेल, तर इतर पर्यायी रेल्वे किंवा बसचा वापर करावा, असे आवाहन कोकण विकास समितीने प्रवाशांना केले आहे.


गोरखपूर, दानापूर, मऊला गाड्या सोडण्याच्या घाईगडबडीत मध्य रेल्वेला चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीचा विसर पडला. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर; तर पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनस येथून कोकण रेल्वेवर एकही उन्हाळी विशेष गाडी न सोडल्यामुळे हे घडलेले आहे. आता तरी प्रशासनाने झोपेतून जागे होऊन पश्चिम रेल्वेवरून रात्री सावंतवाडी; तर मध्य रेल्वेवरून मध्यरात्री रत्नागिरी आणि सकाळी लवकर चिपळूण अशा गाड्या सोडाव्यात.
- अक्षय महापदी, सदस्य, कोकण विकास समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com