जेएनपीए बंदरात १२२ कंटेनर जप्त

जेएनपीए बंदरात १२२ कंटेनर जप्त

नवी मुंबई, ता.१० (वार्ताहर): भारतात प्रतिबंधित असलेले चिनी फटाके, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मायक्रोचिप आणि इतर प्रतिबंधित संशयित वस्तू असल्याच्या संशयावरून जेएनपीटीमधील कस्टम सेंट्रल इंटलिजेंस युनिटने १२२ कंटेनर रोखून ठेवले आहेत.बनावट वस्तूंच्या नावाने जेएनपीए बंदरात हे संशयित कंटेनर आयात करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या कंटेनरची सर्व प्रकारची तपासणी केल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत हे सर्व कंटेनर २४ तास सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहेत.
एकाच जहाजातून जेएनपीटी बंदरात आलेले सर्व १२२ कंटेनरबाबतची गोपनीय माहिती सीआययूला मिळाली होती. या माहितीच्या आधारे यातील काही कंटेनरची तपासणी केली असता, त्यात भारतात प्रतिबंधित असलेल्या वस्तु आढळून आल्या आहेत. यापूर्वी देखील एका चिनी पुरवठादाराने प्रतिबंधित असलेल्या वस्तू तस्करीच्या मार्गाने आयात करण्यात आल्या होत्या. त्याच्याकडूनच पुन्हा कंटनेर पाठवण्यात आले आहेत. यातील काही कंटेनर साफ करण्यात आल्याचे आढळून आल्याने सीआययूने कंटेनर फ्रेट स्टेशन्स (सीएफएस) आणि टर्मिनल्सच्या सर्व व्यवस्थापकांना या संशयित कंटेनरच्या नोंदींची बिले, त्यांचे मूल्यांकन यासह सर्व कंटेनरचे तपशील सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे जेएनसीएचकडुन हे सर्व संशयित कंटेनर तपासणीसाठी रोखून ठेवले आहेत. सीमा शुल्क विभागाने या कारवाईबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com