उल्हासनगरमध्ये दुकानदारावर
कायत्याने जीवघेणा हल्ला

उल्हासनगरमध्ये दुकानदारावर कायत्याने जीवघेणा हल्ला

उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : दुकानात घुसून विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघड झाली आहे. चोखोबा जगताप असे जखमीचे नाव असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच डाव्‍या हाताची चार बोटे छाटली गेली आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईत हलवण्यात आले आहे. दरम्यान, हिललाईन पोलिसांनी दोन तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कॅम्प नंबर ५ मध्ये जगताप यांचे गाऊन विक्रीचे दुकान आहे. जगताप हे गुरुवारी (ता. ९) दुपारी त्यांच्या लहान मुलासह दुकानात होते. त्या वेळी हल्लेखोर मोहन गायकवाड याने दुकानात घुसून जगताप यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात जगताप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच डाव्या हाताची चार बोटे छाटली गेली आहेत. उजव्‍या हातालाही दुखापत झाली आहे. त्यानंतर गायकवाड हा कोयत्यासह फरारी झाला होता. जगताप यांना जखमी अवस्थेत शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
----
पूर्ववैमनस्यातून हल्ला
हल्ल्याबाबत माहिती मिळताच हिललाईन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. सीसी टीव्ही चित्रीकरणात आरोपी पळताना दिसत होता. त्याआधारे ओळख पटवून पोलिसांनी दोन तासांत गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले. गायकवाड याला न्यायालयाने १३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com