अतुल पाटील यांचा महायुतीला पाठिंबा

अतुल पाटील यांचा महायुतीला पाठिंबा

अतुल पाटील यांचा महायुतीला पाठिंबा
दि. बा. पाटील यांच्या मुलाचे आवाहन; आगरी समाज सहकार्य करणार


कल्याण, ता. ११ : लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे. त्यामुळे दि. बा. पाटील यांना मानणाऱ्यांनी आपले मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच द्यावे आणि तीच खरी दि. बा. पाटील यांना श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन लोकनेते दिबांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी केले. अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने आज (ता. ११) कल्याण लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यानंतर डोंबिवली येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना अतुल पाटील यांनी हे आवाहन केले.

यापूर्वीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. यांचे नाव द्यायला ते तयार नव्हते. मात्र त्यांचे सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घाईघाईने घेतला, मात्र त्याला कायदेशीर मान्यता नव्हती. एकनाथ शिंदे यांनी मात्र मुख्यमंत्री होताच हा ठराव बहुमताने मंजूर करून केंद्राकडे पाठवला. त्यामुळे आता केंद्र सरकारही याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेणार असल्याचा विश्वास आगरी समाजातील ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. तसेच फक्त विमानतळच नव्हे, तर कोकण पट्ट्यातील आमचे सगळे प्रश्न सोडवण्याचे काम शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आज श्रीकांत शिंदे यांना आम्ही तुम्हाला पाठिंबा दिल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आगरी समाजाला बळ मिळाले आहे. त्यामुळेच आगरी समाजाने शिंदेंना पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्ष अतुल पाटील, गुलाब वझे, विनोद म्हात्रे, दशरथ भगत, बंडू पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com