मोबाईल नको रे बाबा

मोबाईल नको रे बाबा

वसई, ता. ११ (बातमीदार) : कोणाला मतदान करतो, हे गोपनीय ठेवत असतो. याबाबत ईव्हीएम मशीन काळजी घेत असते. छायाचित्र, छायाचित्रीकरण टाळले जाते; किंबहुना त्यावर बंदीच घातली जाते. काही दिवसांपूर्वी मतदान करताना एकाने रिल्स बनवला होता. यामुळे कायद्याचे उल्लंघन झाले. असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पालघर लोकसभा मतदारसंघातील केंद्रांवर काळजी घेतली जाणार आहे. येथील निवडणूक येत्या २० मे रोजी होणार आहे. या वेळी मतदान केंद्रात छायाचित्र, चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोबाईल केंद्रात घेऊन जाता येणार नाही. यामुळे मतदानही सुरक्षित होणार आहे.
पालघर लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या २१ लाख ४८ हजार ५१४ इतकी आहे. महिला, पुरुष आणि तृतीयपंथींचा समावेश आहे. एकीकडे जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाने समाज माध्यम; तसेच नागरिकांमध्ये लोकशाही उत्सवात सहभागी होण्यासाठी जागृती केली जात आहे. मतदानाचा टक्का वाढावा, हा उद्देश ठेवण्यात आला आहे. अशातच लोकशाही प्रणालीत मताला गोपनीयतेचे महत्त्व असते. त्या‍मुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. मतदारांना मोकळ्या वातावरणात मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तसेच, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोबाईल फोनही मतदान केंद्रात घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येत असते. त्यामुळे मतदान करताना नागरिकांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. पोलिसांची व निवडणूक विभागाची याकडे करडी नजर असणार आहे. जर कायद्याचे उल्लंघन केले, तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
लोकशाही उत्सवाला गालबोट लागू नये आणि प्रत्येक मत गोपनीय असावे, या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे मतदान केंद्राच्या १०० मीटर क्षेत्रात मोबाईल वापरास मनाई असणार आहे. गोपनीयतेचा भंग होऊ नये, म्हणून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवरही लक्ष दिले जाणार आहे.
--------------
अशी होणार शिक्षा
नियमांचा भंग केला आणि चित्रीकरण, छायाचित्रे काढण्यात आली तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यानंतर तीन महिन्यांची कैद किंवा दंड आकारला जाऊ शकतो अथवा दोन्ही शिक्षाही होऊ शकतात. या शिक्षा होऊ नये, यासाठी मतदार व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी.
------------------
नवमतदारांना सेल्फीचा मोह
मतदान करून आल्यावर आपण पहिल्यांदाच मतदान केल्याने उत्साहाचे वातावरण अनेक मतदान केंद्रात दिसून येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रातून बाहेर येणाऱ्या मतदारांना सेल्फीचा मोह आवरता येणार नाही. अनेक ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारल्याने समाज माध्यमांवर आपण केलेले मतदानाचा आनंद दिसून येणार आहे.
--------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com