बनावट औषध निर्मितीप्रकरणी गुन्हा

बनावट औषध निर्मितीप्रकरणी गुन्हा

ठाणे, ता. ११ (वार्ताहर) : मानवी आरोग्यास धोकादायक ठरणारी बनावट औषधे मूळ उत्पादकाची असल्याचे भासवून विक्री केली जात होती. याप्रकरणी विजय चौधरी आणि हरियानातील केपी मेडिकल एजन्सीविरोधात वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
कोकण विभागात औषध निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री शिंदे (४५) यांनी ११ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा मुख्य वागळे इस्टेटमधील शासकीय रुग्णालयाजवळील औषध भांडारात अप्रमाणित बनावट औषधीसाठा फॉर्मोक्स-२५० कॅप्सूल्स ही रेफान फार्मा प्रा.लि. यांच्या औषधांचे नमुने घेतले होते. तपासणीदरम्यान ही औषधे अप्रमाणित ठरवण्यात आली असून औषधांची निर्मिती तसेच विक्री आंतरराज्यात होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com