मुंबईत गारेगार प्रवासाची बेगमी

मुंबईत गारेगार प्रवासाची बेगमी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः ‘बेस्ट’च्या ऐतिहासिक प्रवासाला तब्बल १५० वर्षे झाली आहेत. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’च्या आणिक आगारात शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून उलगडण्यात आला होता. या निमित्ताने पुढील दोनच वर्षांत बेस्टमध्ये पाच हजार एसी बस येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आरामदायी, गारेगार होणार आहे.
मुंबईत ९ मे १८७४ रोजी कुलाबा ते पायधुनी व्हाया क्रॉफर्ड मार्केट आणि बोरीबंदर ते पायधुनी व्हाया काळबादेवी या मार्गाने बेस्टची पहिली बस धावली होती. गेल्या दीडशे वर्षांच्या कालावधीत ‘बेस्ट’च प्रवाशांची पहिली पसंत बनली आहे. आजही रेल्वेनंतर मुंबईची ‘लाइफलाइन’ म्हणून ‘बेस्ट’ समजली जाते. सध्यःस्थितीत ३२ ते ३५ लाख प्रवासी दररोज या सुविधेचा लाभ घेतात. त्यामुळे एकीकडे प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे बसची संख्याही वाढवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे आगामी काळात बसची संख्या वाढण्यासाठी प्रशासनाकडून अधिक भर दिला जाणार आहे.
.........
गारेगार, पर्यावरणपूरक प्रवास
‘बेस्ट’च्या ताफ्यात सध्या ३,०३८ बस आहेत. यातील अनेक बसची कालमर्यादा संपल्याने कालबाह्य झाल्या आहेत. यावर्षी ५०० बस सेवेतून बाद होणार आहेत. त्यामुळे नव्या एसी बस आणल्या जाणार आहेत. या गाड्यांचे तिकीटही माफक असेल. त्यामुळे मुंबईकरांना फायदा होणार आहे. शिवाय इलेक्ट्रिक गाड्यांमुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागणार आहे.
.......
‘बेस्ट’चा सध्याचा ताफा
एकूण बस - ३,०३८
बेस्टच्या गाड्या - १,०९७
भाडेतत्त्वावरील - १,९४१
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com