महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
उरण, ता. १२ (बातमीदार) ः उरण परिसरातील शासकीय कार्यालयांमध्ये महात्‍मा बसवेश्‍वर यांची जयंती साजरी करण्यात आली. उरण तहसील कार्यालयात तहसीलदार उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सहायक शिवाजी सूर्यवाड. अनिल चासकर, शिपाई दत्तात्रेय भोपी व इतर कर्मचाऱ्यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. उरण पंचायत समिती कार्यालय, उरण नगर परिषद कार्यालयातही जयंती साजरी झाली. शासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी व्हावी, यासाठी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने पाठपुरावा केला होता. यावेळी शिवा संघटनेचे पदाधिकारी बालाजी हेड्डे, विट्ठल ममताबादे आदींची उपस्‍थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com