सोशल मीडियावरून मतदारांना आवाहन

सोशल मीडियावरून मतदारांना आवाहन

सोशल मीडियावरून मतदारांना आवाहन
खारघर, ता. १२ (बातमीदार) ः मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (ता. १३) मतदान होत असून सर्वच राजकीय पक्ष, पदाधिकारी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्‍याचे दिसत आहे.
या मतदान प्रक्रियेत तुमच्या कुटुंबातील पात्र मतदारांनी लोकशाही उत्सव साजरा करा, असा संदेश देणारी निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे. तर आम्हाला मोफत धान्य नको, मोफत शिक्षण हवंय, यासाठी आपल्या अमूल्य मताचा अधिकार बजावा, असे आवाहन काही सामाजिक संस्‍थांकडून सोशल मीडियावरून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com